• Sun. Feb 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रविण पवार यांची बिनविरोध निवड

ByEditor

Sep 15, 2023

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील गोवे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण महादेव पवार यांची गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गोवे ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच घेण्यात आली. या ग्रामसभेत प्रविण महादेव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रविण पवार हे सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असुन त्यांनी गोवे गाव कमिटीचे अध्यक्ष, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, कोलाड रिक्षा संघटनेचे सचिव व पदाधिकारी अशा अनेक क्षेत्रात काम केले आहे.

या निवडीबद्दल विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, विभागीय अध्यक्षा सुप्रिया जाधव, कर्तव्यदक्ष सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच रंजिता जाधव, सदस्य नरेंद्र पवार, नितीन जाधव, भावना कापसे, निशा जवके, अंजली पिंपळकर, सुमित गायकवाड, युवा कार्यकर्ते संदिप जाधव, महेंद्र जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम पवार, लहू पिंपलकर, भरत कापसे, चंद्रकांत कापसे, अमित गायकवाड, गोविंद गायकवाड, रमेश गायकवाड, ग्रामसेवक गोविंद शिद, मयुरी जाधव, अजय पिंपळकर, अश्विनी पोटफोडे, गोवे, मूठवली, शिरवली ग्रामस्थ व महिला मंडळ, गोवे आदिवासी बांधव उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या नंतर कर्तव्यदक्ष सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी केलेल्या विकासकामामुळे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असुन याबद्दलही अभिनंदन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील मुठवली येथील राहिवाशी अभिजित अनंत गायकवाड हे वकील झाल्यामुळे त्यांचाही ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!