मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

माणगावात जुगार अड्ड्यावर छापा! पहाटेच्या कारवाईत ३२ जण ताब्यात, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पहाटेच्या छाप्यात ३२ जुगारी ताब्यात; ९ लक्झरी वाहने आणि २९ मोबाईलसह तब्बल ७५.८२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
सलीम शेख (माणगाव)
गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ | दुपारी १२:१५ ● १०५९ वाचन (Views)
माणगावात जुगार अड्ड्यावर छापा! पहाटेच्या कारवाईत ३२ जण ताब्यात, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
माणगाव पोलीस कारवाई जप्त मुद्देमाल
जाहिरात (Advertisement)

माणगाव । सलीम शेख : माणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कार्तिक हॉटेल समोरील एका व्यावसायिक इमारतीच्या तळघरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पहाटे छापा टाकला.

या धडक कारवाईत जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या ३२ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून घटनास्थळावरून ९ चारचाकी वाहने, २९ स्मार्टफोन्स, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जाहिरात (Advertisement)

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

स्थानिक पोलिसांना सुगावा लागू न देता थेट जिल्हा मुख्यालयाच्या विशेष पथकाने मध्यरात्री सापळा रचून ही कारवाई केली. माणगाव शहर व महामार्गाच्या परिसरात अशा अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सर्व ३२ आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.