मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

नागोठणे रेल्वे स्थानकाच्या विकासाला मिळणार गती; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत प्रमुख मागण्यांना मंजुरी

खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली CSMT येथे झालेल्या मध्य रेल्वेच्या बैठकीत नागोठणे रेल्वे स्थानकातील फलाट २ व ३ ची उंची वाढवणे, तिकीट आरक्षण खिडकी, दिवा-सावंतवाडी ट्रेन व पनवेल-रोहा मेमू गाड्यांना थांबा मिळण्याच्या प्रमुख मागण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्य संपादक
गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ७:२१ ● ३०५ वाचन (Views)
नागोठणे रेल्वे स्थानकाच्या विकासाला मिळणार गती; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत प्रमुख मागण्यांना मंजुरी
जाहिरात (Advertisement)
नागोठणे : नागोठणे रेल्वे स्थानकातील समस्या व प्रवाशांच्या सोयीसुविधांसंदर्भात मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील मुख्य कार्यालयात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर जैन यांच्या विशेष पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आयोजित या उच्चस्तरीय बैठकीत नागोठणेकरांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा होऊन त्यांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत नागोठणे रेल्वे स्थानकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या खालील मागण्या मांडण्यात आल्या:

जाहिरात (Advertisement)

फलाट उंची सक्षमीकरण: फलाट क्रमांक २ व ३ ची उंची वाढविणे.

आरक्षण खिडकी: प्रवाशांच्या सोयीसाठी प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे तिकीट आरक्षण खिडकी (Reservation Window) सुरू करणे.

महत्त्वाचा थांबा: दिवा – सावंतवाडी – दिवा रेल्वे गाडीला नागोठणे स्थानकात अधिकृत थांबा देणे.

मेमू गाड्यांचे थांबे: आगामी काळात सुरू होणाऱ्या पनवेल – रोहा – पनवेल मार्गावरील सर्व मेमू (MEMU) गाड्यांना नागोठणे स्थानकात थांबा मिळणे.

नागोठणेकरांच्या या सर्व रास्त मागण्यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली. यामुळे नागोठणे, रोहा तालुका व परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सोयीचा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीस भाई टके, बाळासाहेब टके, नागोठणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश भोय, राकेश गायकवाड, किसन तांडेल, नारायण मढवी, पत्रकार महेश पवार, शामकांत नेरपागार आदी मान्यवर उपस्थित होते. नागोठणे रेल्वे स्थानकाचा कायापालट आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी खासदार तटकरे व स्थानिक प्रतिनिधींनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मानले जात आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.