महाड क्रीडा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण महाड येथे आयोजित भव्य रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रोहा तालुका संघाने अलिबाग संघाचा ३४-३१ अशा अवघ्या ३ गुणांनी पराभव करत यंदाचा मानाचा चषक पटकावला.
सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांमध्ये एका एका गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून रोह्याच्या सुशांत पाटील याला तर उत्कृष्ट पकडपटू म्हणून अलिबागच्या सागर म्हात्रे याला गौरविण्यात आले.