पेण : विनायक पाटील : कोकणातील पारंपरिक आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे गौरी-गणपती उत्सव. या उत्सवाचे औचित्य साधून निर्माते लाभेश पाटील यांच्या कल्पक संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ या भक्तीगीताचे चित्रीकरण पेण येथील निसर्गरम्य शिव-शंभो बंगल्यात उत्साहात पार पडले.
या गाण्यात प्रसिद्ध अभिनेत्री अदिती पाटील यांच्यासह स्थानिक कलाकारांनी सुंदर अभिनय केला आहे. संगीतकार राहुल साळुंके यांनी या गीताला कोकणी चालीचा अप्रतिम बाज दिला असून लवकरच हे गीत सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
जाहिरात (Advertisement)