माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीचालक तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
माणगाव (सलीम शेख)
माणगाव - पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात रविवारी (१ नोव्हेंबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सोबत असलेला तरुण जखमी झाला आहे.
जाहिरात (Advertisement)
माणगाव पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजीत संजय शर्मा (वय ३२) आणि पूजा मनोज गोरे (वय २७) हे दोघे दुचाकीवरून पुण्याहून माणगावच्या दिशेने येत होते. ताम्हिणी घाटात सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूजा गोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मंजीत शर्मा हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गोरे कुटुंबावर शोकाकूल वातावरण पसरले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याप्रकरणी माणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.