मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

द्रोणागिरीत बिल्डरांच्या बेफिकिरीचा बळी! लिफ्टच्या खड्ड्यात पडून कामगाराचा मृत्यू

सिडको प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उरण (घनःश्याम कडू) द्रोणागिरी नोडमध्ये टोलेजंग टॉवर उभे राहत असतानाच बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आह...
संपादकीय मंडळ
शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ | संध्याकाळी ७:२१ ● ४२५ वाचन (Views)
द्रोणागिरीत बिल्डरांच्या बेफिकिरीचा बळी! लिफ्टच्या खड्ड्यात पडून कामगाराचा मृत्यू
AI Image
जाहिरात (Advertisement)

सिडको प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

उरण (घनःश्याम कडू) द्रोणागिरी नोडमध्ये टोलेजंग टॉवर उभे राहत असतानाच बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. द्रोणागिरी सेक्टर-४७ येथील 'स्कायलार्क' इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टच्या खड्ड्यात पडून विनोद निसाद (वय ४०) या परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे बिल्डरांचा निष्काळजीपणा आणि सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील रहिवासी असलेला विनोद निसाद हा सदर इमारतीमध्ये लादी कापण्याचे काम करत होता व तिथेच वास्तव्यास होता. सोमवारी दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना अचानक तोल जाऊन तो लिफ्टच्या उघड्या खड्ड्यात कोसळला. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, तसेच लिफ्टचा खड्डा सुरक्षेच्या दृष्टीने झाकलेला नव्हता. याप्रकरणी उरण पोलिसांनी बांधकाम कंत्राटदार निमीशभाई व्होरा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सिडकोच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह

द्रोणागिरी नोडमध्ये मोठमोठे प्रकल्प उभे राहत असताना कामगारांच्या सुरक्षेची तपासणी करणारी यंत्रणा नक्की काय करते, असा सवाल उपस्थित होत आहे. सुरक्षेचे जाळे, संरक्षक कठडे आणि हेल्मेट यांसारख्या प्राथमिक सुविधा पुरवणे बंधनकारक असताना कंत्राटदारांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. सिडकोतील काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अशा तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.

नागरी सुविधांचाही बोजवारा

जाहिरात (Advertisement)
केवळ कामगारांची सुरक्षाच नव्हे, तर द्रोणागिरीतील अनेक इमारतींमध्ये नागरी सुविधांचाही अभाव असल्याचे चित्र आहे. वापर परवाना (OC) न घेता काही इमारतींमध्ये रहिवाशांना ताबा दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सिडको प्रशासनाने द्रोणागिरीतील सर्वच बांधकामस्थळांची सखोल चौकशी करून दोषी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.