मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

उरणमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न!

कामावरून दुचाकीने घरी परतणाऱ्या एका तरुणाला अडवून त्याला बेदम मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. २२) सायंकाळी उघडकीस आला आहे.
मुख्य संपादक
शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ | संध्याकाळी ९:०६ ● १२१८ वाचन (Views)
उरणमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न!
जाहिरात (Advertisement)

कामावरून घरी परतताना मोठे भोम येथील घटना; जखमी तरुण नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल

उरण (अनंत नारंगीकर) कामावरून दुचाकीने घरी परतणाऱ्या एका तरुणाला अडवून त्याला बेदम मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. २२) सायंकाळी उघडकीस आला आहे. उरण तालुक्यातील मोठे भोम येथील पेट्रोल पंपाजवळ ही थरारक घटना घडली. नमेश कृष्णा पाटील (वय ३१, रा. सारडे) असे या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नमेश पाटील हा तरुण कामावरून दुचाकीने आपल्या सारडे येथील घरी जात होता. मोठे भोम परिसरातील पी. पी. खारपाटील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीने त्याला अडवले. त्यानंतर आरोपीने नमेशला बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर ज्वलनशील पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर अज्ञात हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला.

रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमी नमेशला मोठे भोम येथील स्थानिक क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी व क्लिनिकमध्ये धाव घेतली. जखमी तरुणाची गंभीर अवस्था पाहता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी नागरिक आणि पोलीस यंत्रणेच्या मदतीने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे उरण परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात हल्लेखोराने हा प्रकार कोणत्या कारणातून केला, याचा शोध उरण पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जाहिरात (Advertisement)
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.