११ दिवसांपूर्वी
रायगड किल्ला आणि परिसर पर्यटन विकास आराखड्यांतर्गत सर्व विकास व संवर्धन कामे नियोजनबद्ध आणि कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या रायगड प्राधिकरण समितीच्या ३१ व्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला. यामध्ये ए.एस.आय.ची मंजूर कामे, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाईवर उपाययोजना, शिवसृष्टी प्रकल्प, प्रवासी व साहित्य रोपवेचे प्रस्ताव आणि अभिलेख दस्तऐवजीकरण कक्ष स्थापनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.