मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

माणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! निजामपूरमध्ये BSNL टॉवरवर चोरी करताना दोघे रंगेहाथ जेरबंद; ९ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

माणगाव तालुक्यातील सार्वजनिक दूरसंचार यंत्रणेच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे. निजामपूर येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) मोबाईल टॉवर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तांब्याच्या तारा आणि इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या चोरी करताना दोन संशयित आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
मुख्य संपादक
शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ | संध्याकाळी ८:४८ ● ७२० वाचन (Views)
माणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! निजामपूरमध्ये BSNL टॉवरवर चोरी करताना दोघे रंगेहाथ जेरबंद; ९ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
जाहिरात (Advertisement)
माणगाव (सलीम शेख) माणगाव तालुक्यातील सार्वजनिक दूरसंचार यंत्रणेच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे. निजामपूर येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) मोबाईल टॉवर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तांब्याच्या तारा आणि इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या चोरी करताना दोन संशयित आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे हा चोरीचा मोठा प्रयत्न उधळला गेला असून, गुन्ह्यात वापरलेल्या अर्टिगा कारसह एकूण ९ लाख १८ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबरच्या मध्यरात्री निजामपूर येथील बीएसएनएल कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तांब्याच्या तारा कापून नेणे व बॅटऱ्या लांबवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, परिसरात गस्त घालणाऱ्या माणगाव पोलिसांनी संशयित हालचाली ओळखून तातडीने धाव घेतली आणि दोघांना जागीच ताब्यात घेतले. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी

१. बाळू ऊर्फ किशोर ज्ञानेश्वर नागमार (वय ३०, मूळ रा. भोपीची वाडी, ता. सुधागड; सध्या रा. लाडवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) २. शाबीर मोहम्मदअली शेख (वय २३, रा. लाडवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) विशेष म्हणजे, या दोन्ही आरोपींवर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे.

'बीट पेट्रोलिंग'मुळे उघडकीस आला प्रकार

जाहिरात (Advertisement)
महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्या जाणाऱ्या बीट पेट्रोलिंग आणि मध्यरात्रीच्या गस्तीमुळेच हा गुन्हा ऐनवेळी उघडकीस आला. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार माणगाव पोलीस ठाण्याकडून संवेदनशील भागात नियमित गस्त घातली जात आहे. सार्वजनिक मालमत्तेची चोरी रोखण्यात पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.