महाराष्ट्र बातम्या

मराठी बातम्या आणि महाराष्ट्रातील घडामोडी | ठाकरेंच्या शिवसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर

संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रारीप्रकरणी सचिवाविरोधात गुन्हा दाखल; समाजसेविका वैदेही सावंत यांच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश

संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रार अर्जात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी असोसिएशनचे सचिव अभिजित सुर्वे यांच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. समाजसेविका वैदेही सावंत यांच्या कायदेशीर लढ्याला मिळालेल्या या यशामुळे हा विषय राज्यभरात चर्चेत आला आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील; सतेज पाटील गटाला धक्का

गोकुळ दूध संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी विजय मिळवत अध्यक्षपद पटकावले आहे. सतेज पाटील गटाच्या शशिकांत पाटील-चुयेकर यांचा पराभव करत महायुतीने गोकुळच्या सत्तेवर वर्चस्व सिद्ध केले. शासननियुक्त ४ संचालकांच्या मतदानाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकीय नाट्यानंतर न्यायालयाने निवडणुकीस परवानगी दिली होती, ज्यामध्ये अखेर राजेश पाटील यांनी बाजी मारली.

खोट्या आरोपांमुळे चारित्र्यहनन झाल्याचा दावा करत समाजसेविका वैदेही सावंत यांचा शाळेबाहेर शांततापूर्ण निषेध

संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रारीमुळे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप करत, उच्चशिक्षित समाजसेविका वैदेही सावंत यांनी पी. एस. बने स्कूलच्या बाहेर केलेला शांततापूर्ण निषेध.

सहकाराच्या रणांगणात राजकीय डावपेच : स्वायत्तता जपणार की राजकारणाच्या बळी ठरणार?

कोल्हापूरच्या 'गोकुळ' दूध संघाच्या राजकारणावर आणि सहकार क्षेत्रातील गलिच्छ राजकीय हस्तक्षेपावर परखड भाष्य करणारा संपादकीय लेख. निवडणुकांचे कौल नाकारून सुरू असलेल्या राजकीय डावपेचांमुळे शेतकरी आणि सहकाराच्या भवितव्यावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह.

विधानपरिषद निवडणूक: ३ पदवीधर जागांवर मविआचे वर्चस्व, तर २ शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा विजय!

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघांच्या तिन्ही जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.