नागपुरात काँग्रेसचे अभिजित वंजारी, संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. प्रतापसिंह पाटील तर पुण्यात हर्षदा देशमुख-जाधव विजयी
मुंबई: विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघांच्या तिन्ही जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, शिक्षक मतदारसंघातील २ जागांवर महायुतीने बाजी मारली आहे. १. नागपूर पदवीधर: अभिजित वंजारी यांचा दणदणीत विजय भाजपचा पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात रात्री उशिरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. भाजपच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात मतांची गणिते बदलल्याने वंजारी यांनी बाजी मारली.परिच्छेद मजकूर...
२. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर: १८ वर्षांनंतर सत्तांतर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्या १८ वर्षांच्या वर्चस्वाला धक्का दिला. दुसऱ्या पसंतीची मते मोजल्यानंतर पाटील यांनी १३,२०७ मतांची निर्णायक आघाडी घेत चव्हाण यांचा पराभव केला. डॉ. प्रतापसिंह पाटील: ७४,१४२ मते सतीश चव्हाण: ६०,९३५ मते ३. पुणे पदवीधर: हर्षदा देशमुख-जाधव यांची बाजी पुणे पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा ९,९२८ मतांनी पराभव केला. प्रदीर्घ वेळ चाललेल्या मतमोजणीत ४४ व्या बाद फेरीत विजयाचा कोटा पूर्ण करत हर्षदा देशमुख यांनी १,१३,८४० मते मिळवून विजय मिळवला, तर स्मिता जाधव यांना १,०३,९१२ मतांवर समाधान मानावे लागले. शिक्षक मतदारसंघात महायुतीची कामगिरी: पुणे शिक्षक मतदारसंघ: भारतीय जनता पक्षाचे कौस्तुभ गावडे यांनी ६,७७० मतांच्या फरकाने विजय मिळवत तब्बल १८ वर्षांच्या खंडानंतर या मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवला. त्यांनी शिंदेसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांचा पराभव केला. २४ वर्षे वयाचे गावडे हे या मतदारसंघातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत, तर काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.