शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

माणगावची १५८ कोटींची भुयारी गटार योजना १० विरुद्ध ६ मतांनी मंजूर

जागतिक बँक अर्थसहाय्यित आणि एमयुडब्लूआरइपी (MUWREP) अंतर्गत माणगाव नगरपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या १५८ कोटी रुपयांच्या बहुचर्चित भुयारी गटार योजनेची विशेष सभा गुरुवारी (दि. २९) प्रचंड वादळी ठरली. नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत १० विरुद्ध ६ मतांनी ही योजना मंजूर करण्यात आली.
मुख्य संपादक
गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ | दुपारी ५:३७ ● ३३३ वाचन (Views)
माणगावची १५८ कोटींची भुयारी गटार योजना १० विरुद्ध ६ मतांनी मंजूर
जाहिरात (Advertisement)
विशेष सभा वादळी; सभा नियमबाह्य असल्याचा विरोधी नगरसेवकांचा आक्षेप आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचा इशारा माणगाव (सलीम शेख)

जागतिक बँक अर्थसहाय्यित आणि एमयुडब्लूआरइपी (MUWREP) अंतर्गत माणगाव नगरपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या १५८ कोटी रुपयांच्या बहुचर्चित भुयारी गटार योजनेची विशेष सभा गुरुवारी (दि. २९) प्रचंड वादळी ठरली. नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत १० विरुद्ध ६ मतांनी ही योजना मंजूर करण्यात आली. मात्र, ही सभा नियमबाह्य आणि अवैध असल्याचा तीव्र आक्षेप घेत विरोधी नगरसेवकांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

योजनेला मंजुरी आणि विरोधकांचा आक्षेप

यापूर्वी २७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सभेत १६ विरुद्ध शून्य मतांनी ही योजना रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, मंजूर योजना परत जाऊ नये आणि शहराचा विकास व्हावा, यासाठी नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी आज विशेष सभा बोलावली होती. यावेळी नगराध्यक्ष सुर्वे यांनी, खासदार सुनील तटकरे व ॲड. राजीव साबळे यांच्या प्रयत्नांनी आलेली ही योजना शहराच्या हिताची असल्याचे स्पष्ट केले.

यावर आक्षेप घेताना माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद यादव, ज्ञानदेव पवार, कपिल गायकवाड, ममता थोरे आणि राजेश मेहता यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ८१/४ (ब) नुसार ही सभा नियमबाह्य असल्याचा दावा केला. नगरपंचायतीची बिकट आर्थिक स्थिती, कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज बिल आणि नागरिकांवर पडणारा कराचा बोजा या मुद्द्यांवर त्यांनी तीव्र विरोध दर्शवला.

नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्यासह १० नगरसेवकांनी योजनेच्या बाजूने हात वर करून मंजुरी दिली. आनंद यादव, ज्ञानदेव पवार, कपिल गायकवाड, ममता थोरे, राजेश मेहता आणि दिनेश रातवडकर यांच्यासह ६ नगरसेवकांनी सभेला व ठरावाला विरोध केला. तर नगरसेवक प्रशांत साबळे यांनी या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेतली.

सभेच्या वैधतेबाबत मुख्याधिकारी संतोष माळी यांना विचारले असता, त्यांनी नगराध्यक्ष या सभेच्या पीठासन अधिकारी असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.

नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सभा संपल्यानंतर विरोधी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सभा नियमबाह्य असल्याचा पुनरुच्चार करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "विकासकामांना कोणीही विरोध करू नये. जर ही १५८ कोटींची योजना हातची गेली, तर माणगाव नगरीत भविष्यात गटारांचे साम्राज्य निर्माण होईल. त्यामुळे शहराच्या विकासासाठी सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवले पाहिजे."
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

रायगडच्या सहकार क्षेत्रात कौशल्यविकासाचे नवे पर्व!

अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आणि रायगड जिल्हा ईएम-पॅक्स सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादित (रामफेड), अलिबाग यांच्या वतीने सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकासाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पाटणसई येथे मटका जुगारावर छापा, ५,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त; नागोठणे पोलीस ठाण्याची कारवाई

नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसई स्टॉप येथील 'आराध्य जनरल व टी स्टोअर्स' दुकानामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी यशस्वी छापा टाकला आहे.

बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीची मुजोरी कायम

उरण तालुक्यातील बांधपाडा ( खोपटे ) ग्रामपंचायत हद्दीतील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनी व्यवस्थापनाने १९ स्थानिक शेतकरी प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यास नकार दर्शवून आपली मुजोरी कायम सुरू केल्याने कामगार नेते अजित म्हात्रे यानी दुसऱ्या दिवशीही कंपनीच्या गेट समोर आपले आंदोलन सुरू ठेवले आहे.

वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन; २६ जिल्ह्यांतील १० हजार कामगारांचा सहभाग

वेतनवाढ, रोजगार सुरक्षा, कंत्राटदारांची अरेरावी आणि प्रलंबित आर्थिक लाभांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (भारतीय मजदूर संघ) वतीने मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.