मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

खोट्या आरोपांमुळे चारित्र्यहनन झाल्याचा दावा करत समाजसेविका वैदेही सावंत यांचा शाळेबाहेर शांततापूर्ण निषेध

संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रारीमुळे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप करत, उच्चशिक्षित समाजसेविका वैदेही सावंत यांनी पी. एस. बने स्कूलच्या बाहेर केलेला शांततापूर्ण निषेध.
मुख्य संपादक
सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ | दुपारी ५:४० ● २५२ वाचन (Views)
खोट्या आरोपांमुळे चारित्र्यहनन झाल्याचा दावा करत समाजसेविका वैदेही सावंत यांचा शाळेबाहेर शांततापूर्ण निषेध
जाहिरात (Advertisement)
देवरुख : संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रारीतील कथित आरोपांमुळे आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचल्याचे आणि सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आल्याचे सांगत, उच्चशिक्षित समाजसेविका सौ. वैदेही प्रभावती सुधीर सावंत यांनी गुरुवारी सायंकाळी पी. एस. बने नॅशनल School, साडवली येथील प्रवेशद्वाराबाहेर शांततापूर्ण जाहीर निषेध नोंदवला. या घटनेमुळे देवरुख परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

.

पी. एस. बने नॅशनल स्कूल, साडवली येथे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय किशोर-किशोरी गट अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला आपला कोणताही विरोध नव्हता, असे सौ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात (Advertisement)
परंतु, संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनने देवरुख पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून पूर्वकल्पना न देता नोटीस बजावली. या नोटिशीमध्ये स्पर्धेच्या आयोजनात व्यत्यय आणणे, मान्यवरांशी बळजबरीने लगट करणे आणि फोटो काढण्याचा आग्रह धरल्याचे आरोप नमूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

"माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह"

या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त करताना सौ. सावंत म्हणाल्या, "एका महिलेच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवले जाणे अत्यंत वेदनादायक आहे. मी गेली २२ वर्षे समाजसेवेत निस्वार्थपणे कार्यरत असून, विधवा व निराधार एकल महिलांच्या कल्याणासाठी मोठे कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन मला १७ राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच १९ वर्षे महिला पोलीस दक्षता कमिटीत विनामोबदला सेवा दिली आहे. असे असताना माझ्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असून माझे मानसिक खच्चीकरण आणि चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न आहे."

आपल्या हातात 'मला न्याय हवा आहे - खोट्या आरोपांविरोधात शांततापूर्ण निषेध' असा फलक घेऊन त्या शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर शांतपणे बसल्या होत्या. यावेळी देवरुख पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. स्पर्धा संपल्यानंतर पहाटे ३ वाजता त्या घरी परतल्या.

आंदोलनादरम्यान माणुसकीचे दर्शन

या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान काही शाळकरी मुलांनी आणि किशोरवयीन मुलींनी त्यांना चकली, मिरिंडा आणि वडापावविषयी विचारपूस करत आपुलकी दाखवली. "आम्ही तुमच्याकडून प्रेरणा घेत आहोत," असे सांगत मुलींनी पाठिंबा दिल्यामुळे मनाला आधार मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

निष्पक्ष चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी सौ. वैदेही सावंत यांनी केली आहे. आपल्या स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड करणार नसून आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील; सतेज पाटील गटाला धक्का

गोकुळ दूध संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी विजय मिळवत अध्यक्षपद पटकावले आहे. सतेज पाटील गटाच्या शशिकांत पाटील-चुयेकर यांचा पराभव करत महायुतीने गोकुळच्या सत्तेवर वर्चस्व सिद्ध केले. शासननियुक्त ४ संचालकांच्या मतदानाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकीय नाट्यानंतर न्यायालयाने निवडणुकीस परवानगी दिली होती, ज्यामध्ये अखेर राजेश पाटील यांनी बाजी मारली.

सहकाराच्या रणांगणात राजकीय डावपेच : स्वायत्तता जपणार की राजकारणाच्या बळी ठरणार?

कोल्हापूरच्या 'गोकुळ' दूध संघाच्या राजकारणावर आणि सहकार क्षेत्रातील गलिच्छ राजकीय हस्तक्षेपावर परखड भाष्य करणारा संपादकीय लेख. निवडणुकांचे कौल नाकारून सुरू असलेल्या राजकीय डावपेचांमुळे शेतकरी आणि सहकाराच्या भवितव्यावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह.

विधानपरिषद निवडणूक: ३ पदवीधर जागांवर मविआचे वर्चस्व, तर २ शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा विजय!

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघांच्या तिन्ही जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.