मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

"आम्ही मान इकडे तिकडे केली असती तर त्यांची सीट गेली असती"; मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना सुनावलं

रायगडमधील चौघा आमदारांमुळेच खासदार सुनील तटकरे निवडून आले असल्याचा दावा करत, मंत्री भरत गोगावले यांनी उदय सामंत यांच्या विधानाची जोरदार पाठराखण केली.
मुख्य संपादक
सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ७:४८ ● २८४ वाचन (Views)
"आम्ही मान इकडे तिकडे केली असती तर त्यांची सीट गेली असती"; मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना सुनावलं
जाहिरात (Advertisement)
रायगड : कोकणातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील उर्वरित तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. दरम्यान, खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वाद आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिटवतील, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या "आम्हीच खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणले" या विधानाची गोगावले यांनी पूर्ण पाठराखण करत तटकरे यांना अप्रत्यक्षरीत्या खडेबोल सुनावले आहेत.

उदय सामंत यांचे विधान अगदी योग्य: भरत गोगावले

जाहिरात (Advertisement)
मंत्री उदय सामंत यांच्या विधानावर बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, "उदय सामंत जे बोलले, ते अगदी योग्यच आहे. महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, योगेश कदम आणि मी; आम्ही चौघे नसतो तर खासदार सुनील तटकरे निवडून आले नसते. आम्ही जरा जरी मान इकडे तिकडे हलवली असती, तरी रायगड लोकसभेची त्यांची एकमेव जागा हातातून गेली असती." त्यामुळे सामंत यांच्या वक्तव्यात कोणतीही चुकीची गोष्ट नसून त्यांनी वस्तुस्थिती मांडल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीवर मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार

या राजकीय वादाच्या मुद्द्यासोबतच कोकणातील शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील जे तालुके अद्याप दुष्काळात समाविष्ट झालेले नाहीत, त्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार प्रस्ताव मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

महाड तालुक्यात खळबळ: ग्रामसेवक गजानन गाढवे यांचा संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह

महाड तालुक्यातील दहिवड आणि वाळण परिसरातील जंगलात पंदेरी गावचे ग्रामसेवक गजानन गाढवे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्राथमिक संशय असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी स्थानकात वन्यप्राण्याची तस्करी उघडकीस! पोत्यात आढळला ५ फूट लांबीचा जिवंत अजगर; तस्करी की जादूटोण्यासाठी वापर?

मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावरील करंजाडी रेल्वे स्थानक परिसरात सिमेंटच्या पोत्यात ५ फूट लांबीचा जिवंत अजगर आढळून आल्याने खळबळ उडाली असून, वन्यजीवांची तस्करी की जादूटोणा याचा संशय व्यक्त होत आहे.

माणगाव उपविभागीय प्रयोगशाळेमार्फत पाण्याचे नियमित परीक्षण; दोनच कर्मचाऱ्यांवर चार तालुक्यांचा भार

माणगाव उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेमार्फत चार तालुक्यांतील पाण्याच्या नमुन्यांची नियमित जैविक व रासायनिक तपासणी होत असली, तरी केवळ दोनच कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा भार असल्याने रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

दुष्काळी झळांकडे दुर्लक्ष करून म्हसळ्यात सत्ताधाऱ्यांचा थाटामाटात 'दीपोत्सव', नागरिकांमधून तीव्र संताप

राज्यात आणि म्हसळ्यात दुष्काळाचे भीषण सावट असताना, सत्ताधाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या थाटामाटातील दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवरून नागरिक आणि विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त.