मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी स्थानकात वन्यप्राण्याची तस्करी उघडकीस! पोत्यात आढळला ५ फूट लांबीचा जिवंत अजगर; तस्करी की जादूटोण्यासाठी वापर?

मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावरील करंजाडी रेल्वे स्थानक परिसरात सिमेंटच्या पोत्यात ५ फूट लांबीचा जिवंत अजगर आढळून आल्याने खळबळ उडाली असून, वन्यजीवांची तस्करी की जादूटोणा याचा संशय व्यक्त होत आहे.
मुख्य संपादक
सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ६:५१ ● ५७४ वाचन (Views)
कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी स्थानकात वन्यप्राण्याची तस्करी उघडकीस! पोत्यात आढळला ५ फूट लांबीचा जिवंत अजगर; तस्करी की जादूटोण्यासाठी वापर?
जाहिरात (Advertisement)
महाड (मिलिंद माने)

मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील करंजाडी रेल्वे स्थानक परिसरात रविवारी सायंकाळी एका सिमेंटच्या पोत्यात जिवंत वन्यजीव आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाड येथील 'सिस्केप' (SEESCAPE) संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, पोत्यामध्ये अनुसूची-१ (Schedule 1) दर्जाचा पाच फूट लांबीचा जिवंत अजगर आढळून आला. या प्रकारामुळे रेल्वे मार्गावरून वन्यजीवांची तस्करी होत असल्याचा अथवा जादूटोण्यासाठी (ब्लॅक मॅजिक) त्यांचा वापर केला जात असल्याचा संशय वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.

जाहिरात (Advertisement)
'सिस्केप'च्या वन्यजीव मित्रांची तत्परता

करंजाडी रेल्वे स्थानकावर एका प्लास्टिकच्या पोत्यात काहीतरी हालचाल होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 'सिस्केप' संस्थेला दिली. माहिती मिळताच रविवारी रात्री आठच्या सुमारास संस्थेचे शार्दुल वारंगे, योगेश गुरव व त्यांच्या अन्य चार सहकाऱ्यांनी करंजाडी रेल्वे स्थानकात धाव घेतली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या परवानगीने स्थानक परिसरात शोध घेतला असता, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या गोणीत गाठ मारलेला ५ फूट लांबीचा अजगर निदर्शनास आला.

संस्थेच्या सदस्यांनी सुटका केलेल्या या अजगराला महाड वनविभागाच्या स्वाधीन करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सोमवारी सकाळी सुरू केली. दिवाळीच्या सणाची वेळ असतानाही रात्रीच्या वेळी तत्परता दाखवून अजगराची सुटका केल्याबद्दल स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून 'सिस्केप' संस्थेचे कौतुक होत आहे.

तस्करी की जादूटोणा? चौकशीची मागणी

एकीकडे कोकण मार्गावर अवैध दारू वाहतुकीवर पोलीस कारवाई करत असतानाच, दुसरीकडे अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या 'अनुसूची-१' दर्जाच्या अजगराची अशा प्रकारे वाहतूक होत असल्याचे समोर आल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा अजगर तस्करीसाठी आणला होता की जादूटोण्यासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वे प्रशासन आणि वनविभागाने या मार्गावर विशेष खबरदारी बाळगावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

महाड तालुक्यात खळबळ: ग्रामसेवक गजानन गाढवे यांचा संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह

महाड तालुक्यातील दहिवड आणि वाळण परिसरातील जंगलात पंदेरी गावचे ग्रामसेवक गजानन गाढवे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्राथमिक संशय असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

"आम्ही मान इकडे तिकडे केली असती तर त्यांची सीट गेली असती"; मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना सुनावलं

रायगडमधील चौघा आमदारांमुळेच खासदार सुनील तटकरे निवडून आले असल्याचा दावा करत, मंत्री भरत गोगावले यांनी उदय सामंत यांच्या विधानाची जोरदार पाठराखण केली.

माणगाव उपविभागीय प्रयोगशाळेमार्फत पाण्याचे नियमित परीक्षण; दोनच कर्मचाऱ्यांवर चार तालुक्यांचा भार

माणगाव उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेमार्फत चार तालुक्यांतील पाण्याच्या नमुन्यांची नियमित जैविक व रासायनिक तपासणी होत असली, तरी केवळ दोनच कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा भार असल्याने रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

दुष्काळी झळांकडे दुर्लक्ष करून म्हसळ्यात सत्ताधाऱ्यांचा थाटामाटात 'दीपोत्सव', नागरिकांमधून तीव्र संताप

राज्यात आणि म्हसळ्यात दुष्काळाचे भीषण सावट असताना, सत्ताधाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या थाटामाटातील दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवरून नागरिक आणि विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त.