मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

स्मार्ट मीटरविरोधात शेकाप आक्रमक; गणेशोत्सवानंतर अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकणार

महावितरणकडून लादल्या जाणाऱ्या स्मार्ट वीज मीटरविरोधात शेतकरी कामगार पक्ष मैदानात; अलिबागमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा.
मुख्य संपादक
मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ | दुपारी ४:३० ● ८९७ वाचन (Views)
स्मार्ट मीटरविरोधात शेकाप आक्रमक; गणेशोत्सवानंतर अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकणार
अलिबाग शेकाप कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद
जाहिरात (Advertisement)

अलिबाग वृत्तसेवा : महावितरण कंपनीकडून सामान्य ग्राहकांच्या घरावर बसवण्यात येत असलेल्या तथाकथित ‘स्मार्ट मीटर’मुळे वीज बिलात दुपटीने वाढ होत असल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आता आक्रमक झाला आहे.

अलिबाग येथील शेकाप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत गणेशोत्सवानंतर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात (Advertisement)
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.