बातमी शोधा (Search News)

'रायगड जिल्हा' या शब्दासाठी १४ बातम्या आढळल्या.

पेणमध्ये अत्याधुनिक टर्फ इनडोअर क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

पेण नगरपरिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या टर्फ इनडोअर क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते झाले. या सुविधेमुळे रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना पावसाळ्यासह वर्षभर क्रिकेट सरावाची उत्तम संधी मिळणार आहे.

रायगडमध्ये महायुतीत जुंपली! “महेंद्र थोरवे घटकेत घोड्यावर तर घटकेत गाढवावर”; अनिकेत तटकरेंचा घणाघाती पलटवार

रायगड: रायगड जिल्ह्यात शासकीय प्रकल्पांवरून महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर दारूच्या कारखान्यावरून टीका केल्यानंतर, आमदार अनिकेत तटकरे यांनी थोरवेंना "घटकेत घोड्यावर अन् घटकेत गाढवावर" अशी उपमा देत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

माणगावमध्ये बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २५ जणांवर गुन्हा दाखल, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत ढालघर परिसरातील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, मोबाईल आणि वाहनांसह सुमारे २० लाख ७० हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टेम्पोच्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गोरेगाव-मोर्बा मार्गावर भीषण अपघात

माणगाव तालुक्यातील गोरेगाव-मोर्बा मार्गावर वडवली गावाच्या हद्दीत कचरा टाकून परतणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रायगड जिल्हा परिषद सभा वादळी; पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवरून सदस्यांचा अध्यक्षांना घेराव

पनवेलमधील विसावा रिसॉर्ट येथे पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वितरणावरून आणि मनमानी कारभारावरून जोरदार खडाजंगी झाली. विकासकामांच्या प्रशासकीय मान्यता आदेशांच्या मूळ प्रती त्रयस्थ व्यक्तीच्या ताब्यात दिल्यावरून ठाकरे गटाच्या सदस्या पल्लवी भोईर आणि उरणच्या सदस्या प्रेरणा पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत अध्यक्षांना धारेवर धरले.

रायगडच्या सहकार क्षेत्रात कौशल्यविकासाचे नवे पर्व!

अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आणि रायगड जिल्हा ईएम-पॅक्स सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादित (रामफेड), अलिबाग यांच्या वतीने सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकासाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

माणगावची १५८ कोटींची भुयारी गटार योजना १० विरुद्ध ६ मतांनी मंजूर

जागतिक बँक अर्थसहाय्यित आणि एमयुडब्लूआरइपी (MUWREP) अंतर्गत माणगाव नगरपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या १५८ कोटी रुपयांच्या बहुचर्चित भुयारी गटार योजनेची विशेष सभा गुरुवारी (दि. २९) प्रचंड वादळी ठरली. नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत १० विरुद्ध ६ मतांनी ही योजना मंजूर करण्यात आली.

रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; माणगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अन्नत्याग आंदोलन

कष्टकरी शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आजघडीला आत्महत्येची वेळ आली आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन संपूर्ण रायगड जिल्हा तातडीने 'दुष्काळग्रस्त' जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे माणगाव तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून (दि. २८ ऑक्टोबर) बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

रायगडच्याकौस्तुभ म्हात्रेची महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड; पेण तालुक्यासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि पेण स्पोर्ट्स असोसिएशनचा गुणवान युवा वेगवान गोलंदाज कौस्तुभ हेमंत म्हात्रे याची महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील (अंडर-२३) मुलांच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून रायगड जिल्हा बँकेच्या कार्याचे कौतुक

पेण येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित बँकिंग सुविधा, आर्थिक साक्षरता आणि विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भातील कार्यक्रमात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

रायगडच्या रोशनी पारधीची बीसीसीआयच्या 'वुमेन्स चॅलेंजर्स' स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र संघातून चार खेळाडूंची वर्णी; रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून रोशनीचा सत्कार क्रीडा प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA) व एसबीसी क्रिकेट अकॅडेमी (महाड) ची गुणवान अष्टपैलू ...

माणगावात जुगार अड्ड्यावर छापा! पहाटेच्या कारवाईत ३२ जण ताब्यात, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पहाटेच्या छाप्यात ३२ जुगारी ताब्यात; ९ लक्झरी वाहने आणि २९ मोबाईलसह तब्बल ७५.८२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.