मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

आर्थिक वादातून धमक्या; आईने दोन मुलांसह उचलले टोकाचे पाऊल!

पनवेलजवळील दांडफाटा येथील हिरानंदानी फॉर्च्युन सिटी इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडून आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला. आर्थिक व्यवहारातील वाद आणि जीवे मारण्याच्या धमकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप असून देसाई दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य संपादक
गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ६:४४ ● ७६३ वाचन (Views)
आर्थिक वादातून धमक्या; आईने दोन मुलांसह उचलले टोकाचे पाऊल!
जाहिरात (Advertisement)
पनवेल : तालुक्यातील दांडफाटा येथील 'हिरानंदानी फॉर्च्युन सिटी' गृहप्रकल्पातील मिलोना इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून पडून आईसह दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

मानसी मच्छिंद्र पोपटे (वय ३२), मुलगा रुद्र (वय ११) आणि मुलगी अंशिका (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. पोपटे कुटुंब मूळचे खालापूर तालुक्यातील आश्रय गावचे रहिवासी आहे.

जाहिरात (Advertisement)
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मच्छिंद्र पोपटे यांनी रिअल इस्टेट एजंट विश्वनाथ देसाई यांच्याकडून व्यावसायिक कारणासाठी सुमारे दोन लाख रुपये घेतले होते. या पैशांच्या वसुलीसाठी विश्वनाथ देसाई आणि त्यांची पत्नी अक्षरा देसाई यांच्याकडून सतत तगादा लावला जात होता. घटनेच्या रात्री मच्छिंद्र पोपटे घरी नसताना देसाई दाम्पत्य त्यांच्या घरी पोहचले. त्यानंतर फोनवरून पैशांच्या व्यवहारावरून तीव्र वाद झाला. या दरम्यान पत्नी मानसी आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. याच अतिव मानसिक तणावातून मानसी यांनी दोन्ही मुलांसह अकराव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत पोपटे कुटुंबीय आणि काही स्थानिकांनी तीव्र संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून हत्याकांड असण्याची शक्यताही गृहीत धरून तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणी पनवेल पोलिसांनी संशयित आरोपी विश्वनाथ देसाई आणि अक्षरा देसाई यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. स्थानिक आमदार महेश बालदी यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.