• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मासेमाराच्या गळाला १० फूट लांबीची किळशी मासळी

ByEditor

Nov 9, 2023

घन:श्याम कडू
उरण :
तालुक्यातील मोरा धक्क्यावर गळ टाकून मासेमारी करणाऱ्या मासेमाराच्या गळाला किळशी नावाची मासळी सापडली. ती १० फूट लांबीची आहे. समुद्र किनारी एवढी मोठी किळशी सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

समुद्रात आणि किनाऱ्यावर बसून नायलॉनच्या दोरीला छोटे लोखंडी गळ लावून, त्याला माश्यासाठी घास लावून मोरा धक्क्यावर मासेमारी सुरू होती. सदर मासेमारी करणाऱ्या तरुणाच्या गळाला किळशी लागली. ती बाहेर काढली असता भलीमोठी असून ती १० फूट लांब असल्याचे समजले. मोरा समुद्रकिनारी गळ टाकून मासेमारी करणाऱ्याला एवढी भली मोठी किळशी गळाला लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!