• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरी संपन्न

ByEditor

Dec 1, 2023

प्रतिनिधी
अलिबाग :
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या नियोजनानुसार जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार आज दि.1 डिसेंबर जागतिक दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे अपर जिल्ह्याधिकारी सुनिल थोरवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ॲड. अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शनाखाली 01 डिसेंबर जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त रॅली व मॉब फ्लॅशचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रभात फेरीकरिता जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी (घुगे), लायन्स क्लब श्रीबागच्या अध्यक्ष संजय रावले, ॲड. कला पाटील, मेट्रन श्रीम. भोपी, नर्सिंग स्कुलच्या प्राचार्य गायत्री म्हात्रे उपस्थित होत्या. या प्रभात फेरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जे.एस.एम. कॉलेज, पी.एन.पी. कॉलेज, नर्सिंग स्कूलच्या विद्याथी विद्यार्थिनी सहभाग घेतला. तसेच यावेळी १ डिसेंबर जागतिक दिनाचे महत्व सांगून १ डिसेंबर ते १५ डिसेबरमध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली. ‘आता नेतृत्व व आघाडी समुदायाची; या थिम वर आधारित जनजागृती करण्यात आली.

ही प्रभातफेरी जिल्हा रुग्णालय या ठिकाणावरून सुरुवात करून एस. टी . स्टॅन्ड ते शिवाजी चौक, बालाजी नाका ते जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी संपविण्यात आली. सदर प्रभात फेरीत शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी फलक हातात घेऊन घोषवाक्यासह सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात आल्यानंतर विद्यार्थी, विध्यार्थीनींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्याकडून बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तर लायन्स क्लब श्रीबाग याच्याकडून पाणी वाटप करण्यात आले. तसेच वाय आरजी एजन्सी व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था वडाळा मुंबई यांच्या समन्वयाने किसान ज्युसी ग्रेप स्क्वॅश देऊन प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.

प्रभात फेरीची सांगता झाल्यानंतर पी. एन. पी. (बी.एड) महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी एचआयव्ही/एड्स विषयी मूलभूत माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्हीचा प्रतिबंध, एचआयव्ही संसर्गितांसाठी सेवा सुविधा एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम, एचआयव्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी, एचआयव्ही कसा होता, काय केल्याने होत नाही, एचआयव्ही होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी याबाबत पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण केले.

या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक राजेश किणी, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड ई रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम संपदा मळेकर डापकु, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, समुपदेशक अर्चना जाधव, सचिन जाधव, कल्पना गाडे, मोबाईल आयसीटीसी व्हॅन समुपदेशक रामेश्वर मुळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, वाहनचालक अतिश नाईक, क्लिनर रुपेश पाटील, रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार, वाहनचालक महेश घाडगे, एआरटी अधिकारी डॉ. नालंदा पवनारकर, कर्मचारी समुपदेशक दीप्ती चव्हाण, अक्षय बेरड, डेटा मॅनेजर कोमल लोखंडे, स्टाफ नर्स पल्लवी पडवळ, सीसीसी प्रेमा खंडागळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिसेवीका, सहा.अधिसेवीका, नर्सिंग ऑफिसर, परीसेवीका, सार्व. आरोग्य परिचारिका, अधिपरिचारिका, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयांमधील व ओपीडीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार, सिकलसेल समन्वयक यांनी केले तर व आभार प्रदर्शन कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग संजय माने यांनी मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!