शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: मिनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा

ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात नाव जोडले गेल्यानंतर आणि सतत होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
मुख्य संपादक
गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ | दुपारी ४:२१ ● ८७१ वाचन (Views)
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: मिनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा
जाहिरात (Advertisement)
ठाणे: ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात नाव जोडले गेल्यानंतर आणि सतत होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला आहे.

आपल्या राजीनामा पत्रात मिनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले की, गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. विरोधी पक्ष एकत्र येऊन या प्रकरणी पक्ष नेतृत्वावर नाहक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या हत्येशी त्यांचा कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही, त्यात त्यांचे नाव ओढून पक्षाची आणि नेतृत्वाची प्रतिमा मलिन केली जात आहे.आजवर पूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले असून पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठीच त्यांनी हा राजीनामा दिला आहे; हा निर्णय नाराजीतून घेतलेला नसून पक्षाची प्रतिष्ठा जपण्याच्या भावनेतून घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

प्रताप सरनाईकांच्या भूमिकेनंतर राजीनामा

या प्रकरणावर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत घेतलेल्या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सरनाईक यांनी म्हटले होते की, "जर कोणावर गंभीर आरोप होत असतील, तर ते चुकीचे सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्तीने पक्षाच्या पदापासून दूर राहणे योग्य ठरेल." सरनाईक यांनी हीच भूमिका एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच मिनाक्षी शिंदे यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटून गेला आहे. पूर्णेकर कुटुंबाने मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे थेट आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!