• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे येथील इको चालकाचा अंबा नदीत बुडून मृत्यू

ByEditor

Aug 28, 2024

विनायक पाटील
पेण :
नागोठणे येथे राहणारा ४५ वर्षीय इको चालक शौचास अंबा नदीवर गेला होता. यावेळी त्याचा पाय घसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, खलील उमर कडवेकर (वय ४५) हा दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी ७.३० वा. पासुन बेपत्ता झाला होता. त्यावेळी तो चालवित असलेली इको गाडी क्र. एमएच ०६ सीडी ६७८३ ही नागोठणे येथिल अंबा नदी घाटावर मिळून आली. खलील यास इको गाडी अंबा नदी घाटावर उभी करून नदी किनारी शौचास जाण्याची सवय होती. खलील कडवेकर हा शौचास गेला असताना त्याचा पाय घसरून तो नदीत तोल जावून पडल्याने नदीच्या प्रवाहात वाहून गेला. दि. २८ ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजता खलील याचा मृतदेह खारपाले गावच्या हद्दीत पाण्यात तरंगत असताना मिळून आला. सदर घटनेची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!