• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडचा पंधरा वर्षाखालील मुलींचा क्रिकेट संघ जाहीर; महाडची रोशनी पारधी कर्णधार

ByEditor

Sep 1, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा आमंत्रित एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ काल जाहीर करण्यात आला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हि स्पर्धा होणार आहे. ह्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींची निवड महाराष्ट्राच्या संघात होणार आहे. महाडच्या रोशनी पारधी हिच्याकडे रायगडच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

रोशनी पारधी हिचे गतवर्षी महाराष्ट्राच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली होती. संघ व्यवस्थापक म्हणून प्रज्ञा प्रकाश सकपाळ यांची नेमणूक आरडीसीएकडून करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याचा मुलींचा संघ पुढीप्रमाणे : रोशनी पारधी (कर्णधार),कनक यादव, नाझिया कॉन्ट्रॅक्टर, आर्या गडादे, वैभवी कुलकर्णी, अनिषका वर्मा, स्वरा जगताप, स्तुती विठलानी, निशिता विठलानी, मधुरा बाबर, श्रेया पडळकर, ब्रताती राय, वैदवी वावेकर, ज्ञानेश्वरी येरूणकर

राखीव खेळाडू – स्नेहल पवार, प्रांजल घुले, भूमी राणे, आर्या राजपूत, स्वरा भगत, प्रियांसी गायकवाड, श्रीजा वाघमोडे

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील मुलींसाठी इनडोअर सराव शिबिराचे आयोजन रोशन क्रिकेट क्लब कामोठे येथे करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून नयन कट्टा, शंकर दळवी यांनी मुलींना मार्गदर्शन केले, तर संघ निवडकर्ता म्हणून रवी सोलंकी, देवदत्त शास्त्री, विनय पाटील यांनी योगदान दिले. जिल्हा क्रिकेट अअसोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य व क्रिकेट प्रेमींनी मुलींच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!