घन:श्याम कडू
उरण : उरण तालुक्यातील चिरनेर येथे हिमालयीन ग्रीफोन गिधाड हे निपचित पडलेले आढळून आले आहे. तर, या गिधाडाची सुखरूप सुटका करून वनखात्याच्या ताब्यात देऊन उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळच्या सुमारास चिरनेर गावालगतच्या जंगल भागात एक गिधाड हे खाली पडलेले दिसून आले. यामुळे चिरनेर येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे सदस्य जयवंत ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गिधाडाची पाहणी केली.यावेळी, त्याला उडता येत नसल्याने ते आजारी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यामुळे त्याला वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, हे हिमालयन ग्रीफोन गिधाड असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, वन अधिकाऱ्यांनी हे गिधाड पुढील उपचारासाठी ऐरोली येथील केंद्रात नेण्यात आले आहे. तर, उरण तालुक्यात प्रथमतःच हे हिमालयन गिधाड दिसून आले असल्याचे सांगितले आहे.

