• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये शिवसेनेची नव्या नेतृत्वाखाली पहिली बैठक यशस्वीरीत्या संपन्न

ByEditor

Mar 17, 2025

विठ्ठल ममताबादे
उरण :
उरणमध्ये नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत पक्षबांधणी, संघटनात्मक बळकटी आणि भविष्यातील कार्यपद्धती यावर सखोल चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीला संत तुकाराम महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर झालेल्या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडून टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अतुल भगत, नवनिर्वाचित तालुकाप्रमुख दिपक ठाकूर तसेच उरण विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे, उरण तालुका संघटक चंद्रकांत पाटील, विधानसभा सहसंघटक निखिल पाटील, विधानसभा सह संपर्कप्रमुख प्रीतम पाटील, उपतालुका प्रमुख अमित ठाकूर, पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख बाळा नाईक, चाणजे विभागप्रमुख अक्षय म्हात्रे, नवघर विभागप्रमुख गणेश घरत, उरण तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष तृप्ती घरत, रवींद्र म्हात्रे, सुनील भोईर, दिपक माळी, संजय घरत, महेंद्र घरत, भावेश भोईर, संजीव कुमार, संदीप ठाकूर, हर्षल ठाकूर तसेच अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत उरणमधील शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पक्षासाठी समर्पितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेना बळकट करण्यासाठी नव्या जिल्हा आणि तालुकाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!