रायगड : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांच्या (परिचलन पद्धतीने) पार पडलेल्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदर वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार असून, वाहनचालकांना लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नवे भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत…
मीटर टॅक्सी (CNG) प्रति किलोमीटर भाडे १८.६६ रूपये वरून २०.६६ रूपये करण्यात आले आहे. तसेच किमान १.५ कि.मी. साठीचे भाडे २८ रूपये वरून ३१ रूपये करण्यात आले आहे.ऑटोरिक्षा (CNG) प्रति किलोमीटर भाडे १५.३३ रूपये वरून १७.१४ रूपये करण्यात आले आहे. तसेच किमान १.५ कि.मी. साठीचे भाडे २३ रूपये वरून २६ रूपये करण्यात आले आहे.प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानाधारक आणि वाहनचालकांना आपल्या वाहनांचे मीटर त्वरित रिकॅलिब्रेशन करून घेण्याची सूचना दिली आहे. भाडेवाढ लागू झाल्यानंतर प्रवाशांनीही अद्ययावत दरानुसारच भाडे देण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे.