• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव खतनिर्मिती प्रकल्पाला अखेर गती!

ByEditor

Apr 12, 2025

४३ लाखाच्या खर्चातून, ओला व सुका कचरा वर्गीकरण करून करणार खतनिर्मिती

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञ हि मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुक्याच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी हि मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरिकरण झपाटयाने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचा प्रश्नही तितकाच बिकट बनत चालला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा दैनंदिन घनकचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र या डम्पिंग ग्राउंड भागात हा कचरा ठिकठिकाणी टाकल्याने तो परिसरात पसरत असून या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जनावरे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. माणगाव नगरपंचायतीने खत निर्मिती प्रकल्प उभारला असून त्यातून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

माणगाव नगरपंचायतीकडून हा दैनंदिन निघणारा कचरा ठेकेदारामार्फत उचलून तो डम्पिंग ग्राउंड येथे साठवला जातो. त्या डम्पिंग ग्राउंड येथे दुसऱ्या ठेकेदारामार्फत ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून सुका कचरा एका ठिकाणी साठवून तो पुन्हा कंपनीकडे पाठवला जातो. तर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. खतनिर्मितीचे काम गेले २५ दिवसापासून सुरु झाले असून दररोज माणगाव मध्ये ६ टन कचरा गोळा केला जातो. तो डम्पिंग ग्राउंडवरील खतनिर्मिती प्रकल्पासाठी वापरला जातो त्यातून दररोज जवळपास दीड टन खतनिर्मिती होवू शकते. ओला व सुका कचरा बाजूला करून त्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेसाठी सुमारे ४३ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली असून यांची निविदा काढण्यात आली असून हि प्रक्रिया सुरु झाली आहे. या खतनिर्मितीसाठी पुढील ५ ते ६ महिण्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन साठणारा कचरा हा ठेकेदारामार्फत उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून त्या कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे प्रयोजन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. डम्पिंग परिसरात टाकलेला कचरा हवेने पसरला जातो. तसेच या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याने हवेने व गुरांढोरामुळे पसरून परिसरात रोगाची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा जवळ आला असून नागरिकांचे तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात येत आहे.

माणगाव नगरपंचायतीने खतनिर्मिती प्रकल्पासाठी या घनकचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावून या दैनंदिन गोळा केलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी महत्पपूर्ण पाउल उचलले आहे. माणगावात पूर्वीपासून एका खाजगी जागेत कचरा टाकला जात होता. तेथे कचऱ्याचे ढीग असून त्या कचऱ्याला आग लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो त्यामुळे प्रदुणाचा प्रश्न निर्माण होत आहे. माणगाव नगरपंचायतीची अग्निशमन दलाच्या गाडीच्या पाण्याने हि आग विझवली जाते. आजही डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात कचऱ्याचे ढीग असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे माणगाव स्वच्छ व सुंदर कधी होणार ? हा प्रश्नच आहे. या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण सुका, ओला, व प्लास्टिक व बाटल्या बाजूला करून माणगाव येथील नगरपंचायतीच्या जागेतील पाच एकर असणाऱ्या डंपिग ग्राउंडवर विल्हेवाट लावून खतनिर्मिती करावयाचे प्रयोजन सुरु झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!