• Thu. Apr 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आजचे राशिभविष्य

ByEditor

Apr 22, 2025

मंगळवार, २२ एप्रिल २०२५

मेष राशी
सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते जर तुम्ही असे केले तर, तुम्ही आपल्यासाठी ही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधी ही वेळ काढू शकणार नाही. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल.
भाग्यांक: 4

वृषभ राशी
मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे, म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाºया कुटुंबियांचे आभार माना. आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद ही होऊ शकतो. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमचा/तुमची जोडीदार आज रोमँटिक मूडमध्ये आहे.
भाग्यांक: 9

मिथुन राशी
तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात – आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो, त्याला एक साधे ‘हॅलो’ केलेत तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.
भाग्यांक: 1

कर्क राशी
विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्या सोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.
भाग्यांक: 6

सिंह राशी
तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्या सोबत वेळ घालवू शकतात. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.
भाग्यांक: 3

कन्या राशी
इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहका-यांवर तुम्ही वैतागाल. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि यावेळचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. डोळे सगळं सांगतात, आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात.
भाग्यांक: 1

तूळ राशी
आज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.
भाग्यांक : 4

वृश्चिक राशी
चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आज तुम्ही आपल्या कुठल्या ही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हा ही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल.
भाग्यांक: 5

धनु राशी
स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. अलिकडेच मिळालेल्या यशामुळे नोकरी करणाºया व्यक्तींचे कौतुक होईल आणि सहका-यांकडून त्यांना पाठिंबाही मिळेल. आपल्या घनिष्ट मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.
भाग्यांक: 2

मकर राशी
आरोग्य चांगले राहील. आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.
भाग्यांक: 2

कुंभ राशी
तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत नाही परंतु, आज तुम्हाला पैश्याची किंमत समजू शकते कारण, आज तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. कामात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि चपळाईने कृती केली तर इतरांच्या थोडे वर राहू शकाल. हाताखालच्या सहका-यांच्या उपयुक्त सूचना लक्षपूर्वक ऐकून घ्या. जे लोक आत्तापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो परंतु, घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकतात. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे.
भाग्यांक : 9

मीन राशी
कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकतात. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरित प्रतिक्रिया मिळेल.
भाग्यांक: 7

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!