अलिबाग : तालुक्यातील डेव्हिड स्कूल चोंढी येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणारा शौर्य धनावडे याने घवघवीत यश मिळविले आहे. शौर्य ९८.२० टक्के गुण प्राप्त करत अलिबाग तालुक्यात दुसरा आला.
शौर्य याला भविष्यात रिसर्च सायंटिस्ट व्हायचे आहे आणि त्या दृष्टीने तो आतापासूनच तयारीला लागला आहे. शौर्य याची आई सुविधा धनावडे यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली असून शौर्यच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. माणसामध्ये जिद्द आणि चिकाटी असली की तो कोणतेही ध्येय लीलया पार पाडू शकतो असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. शौर्यचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याची कामगिरी बघून अनेक विद्यार्थ्यांना या निमित्ताने नक्कीच प्रेरणा मिळेल.
