विश्वास निकम
कोलाड : दि. ५ जुन २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेशनेमा गुजराती समाजातर्फे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम खांब येथे वृक्षारोपण करण्यात आले.

दिवसेंदिवस लावण्यात येत असलेले वणवे व भरमसाठ जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतांना दिसत आहे. जंगलेच्या जंगले नष्ट होत आहेत. यामुळे पर्यावरणाने रंग बदलण्यास सुरवात केली आहे. या कारणामुळे भविष्यकाळ कठीण होणार आहे. यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेऊन वेशनेमा गुजराती समाजातर्फे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे आंबा, जास्वंद, गुलाब व इतर झाडांचे रोपण करण्यात आले.
यावेळी वेशनेमा गुजराती समाजाचे डॉ. विनोद गांधी, सपना गांधी, वैशाली शेठ, नैना मेथा, उज्वला मेथा, जितेंद्र मेथा तसेच जनार्दन धामणसे, स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, मुख्यध्यापिका रिया लोखंडे, सह शिक्षिका प्रतिक्षा धामणसे, प्रियांका चिकणे, दर्शना धनवी, मदतनीस श्रुती वाजे व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
