प्रतिनिधी
अलिबाग : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे अलिबाग तालुक्यातील सन – 2025-2030 च्या निवडणूकीकरता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. अलिबाग तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीची सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण करीता राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्या ग्रामपंचायती पैकी सोडत सरपंच पदे आरक्षित करण्यासाठी दि. 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वा. नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, ता. अलिबाग येथे सभा आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी, उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील यांनी केले आहे.
अलिबाग तालुक्यातील सरपंच पदे आरक्षण सोडत 15 जुलै रोजी
