• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पनवेल ते चिपळूण दरम्यान 24 दिवाळी स्पेशल ट्रेन

ByEditor

Oct 7, 2025

मुंबई : दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 30 जादा रेल्वे सोडणार आहे. पनवेल ते चिपळूण दरम्यान 24 स्पेशल ट्रेन धावणार आहेत. येत्या दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी पनवेल – चिपळूणदरम्यान 24 रेल्वेगाड्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगावदरम्यान 6 रेल्वे चालवण्यात येणार आहेत.

रेल्वे क्रमांक 01159 अनारक्षित पनवेल – चिपळूण विशेष रेल्वेगाडी 3 ते 26 ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी पनवेल येथून दुपारी 4.40 वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी रात्री 9.55 वाजता पोहोचेल. रेल्वे क्रमांक 01160 अनारक्षित चिपळूण – पनवेल विशेष रेल्वेगाडी 3 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी चिपळूण येथून सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता पोहोचेल. या विशेष रेल्वेगाडीला सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी या स्थानकात थांबेल. या रेल्वेगाडीला 8 मेमू डबे असतील.

रेल्वे क्रमांक 01003 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 6 ते 20 ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी म्हणजे 6, 13 आणि 20 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 8.20 वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता पोहोचेल. रेल्वे क्रमांक 01004 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वे 5 ते 19 ऑक्टोबरदरम्यान दर रविवारी म्हणजे 5, 12 आणि 19 रोजी मडगाव येथून दुपारी 4.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी 6.20 वाजता पोहोचेल.

या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबा असेल. या रेल्वेला एक वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, दोन वातानुकूलित तृतीय, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय वर्ग, 1 द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १1 जनरेटर व्हॅन असेल. विशेष रेल्वे क्रमांक 01003 साठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर, आयआरसीटीसी या संकेतस्थळावर खुले झाले आहे. तसेच अनारक्षित रेल्वेगाड्यांचे तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे काढता येईल. या तिकिटांसाठी सामान्य अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसारखे शुल्क लागू असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!