• Tue. Feb 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

ByEditor

Feb 10, 2026

रोहा (वार्ताहर) : रोहा उपासना केंद्रातर्फे श्री गजानन महाराज यांचा 148 वा प्रकट दिन रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी अत्यन्त भक्तीपूर्ण वाटावारणात श्री ओंकारेश्वर मंदिरात साजरा करण्यात आला.

उत्सावाचे यंदाचे 5 वे वर्ष असून, रोह्यातील हे उपासना केंद्र ठाणे उपासना अंतर्गत हे केंद्र सुरु असून विजय गद्रे व ऋजुता गद्रे यांच्या विशेष पुढाकारातून हे केंद्र रोहे येथे सुरु झाले व ते गेली पाच वर्ष अव्याहतपणे सुरु आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी श्री ओंकारेश्वर मंदिरात ही उपासना होते.

श्री गजानन महाराज यांच्या 148 व्या प्रकटदिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पारायण, जप,स्तोत्र पठण झाले व पसायदान व आरतीने या प्रकट दिनाची सांगता झाली.

दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रोहा येथील श्री ओंकारेश्वर मंदिरात उपासना होत असते तरी त्यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपासना रोहा केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या उपासना केंद्राला ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे श्री ओंकारेश्वर मंदिर उपलब्ध करून देत असल्याची माहिती श्री. गद्रे यांनी दिली.

ठाणे उपासना केंद्रात होणाऱ्या विविध आध्यत्मिक व सेवाभावी उपक्रमांसाठीही रोहा उपासना केंद्रातुन भक्तगणांची उपस्थिती असते यामध्ये माघ वद्य सप्तमी ते ऋषी पंचमी पर्यंत होणारा गण गण गणांत बोते जप वहीत लिहिणे, डिसेंबर महिन्यात होणारी खामगाव ते शेगाव पदयात्रा, निवासी आध्यत्मिक शिबीर, जागतिक पारायण आदी उपक्रमांचा समावेश आहे. उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपासना केंद्रातील सर्व सदस्यांनी विशेष मेहेनत घेतली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!