नागोठणे | प्रतिनिधी
येथील शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव समिती’च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या नूतन समितीच्या माध्यमातून यंदाचा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, या निवडीबद्दल शिवसेना शाखा नागोठणे यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले आहे.
यावर्षी समितीच्या अध्यक्षपदी इमरान पानसरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्ष म्हणून मुकेश भोय आणि कैलास गोरे यांची नियुक्ती झाली आहे. इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे सोपवण्यात आल्या आहेत:
उपाध्यक्ष: संजय पाटील, अजित दळवी
सेक्रेटरी: श्रीराम मांगले
सह सेक्रेटरी: अविनाश भोसले
खजिनदार: संदीप राऊत
सह खजिनदार: बाळू रटाटे
सल्लागार: कीर्ती कुमार कळस, जितेंद्र कजबजे, सुहेल पानसरे, मनोज कोळी.
समितीच्या सदस्य पदी संतोष घोसाळकर, सचिन रोडेकर, मंगेश वाघमारे, प्रसाद कोळी, नागेश सुर्वे, सलीम अखतार, प्रवीण चितळे, दिनेश वादळ, संदीप शिर्के आणि रुपेश जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नवनियुक्त कार्यकारिणीचे शिवसेना शाखा नागोठणे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. शाखाप्रमुख राजेश सुर्वे, उपशाखाप्रमुख पंकज कामथे, संपर्कप्रमुख मुकेश भोय आणि शहर संघटक बाळू रटाटे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. “शिवछत्रपतींचा वारसा आणि विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही समिती जोमाने कार्य करेल,” असा विश्वास व्यक्त करत सर्व मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीमुळे नागोठणे परिसरात उत्साहाचे वातावरण असून, शिवजयंतीच्या तयारीला आता वेग येणार आहे.
