प्रतिनिधी | पाली
श्री बल्लाळेश्वर देवस्थान, पाली आणि रुधिरसेतू सेवा संस्था, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी पाली येथील भक्त निवास क्रमांक २ मध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थानच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘एक थेंब रक्ताचा… कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो!’ या उदात्त हेतूने हे शिबीर आयोजित केले जात आहे.
रक्तदानाचे महत्त्व पटवून देताना आयोजकांनी सांगितले की, रक्ताची गरज कधी आणि कुणाला भासेल हे सांगता येत नाही; परंतु रक्तदात्याचा एक हात नक्कीच कोणासाठी तरी जगण्याची नवीन आशा बनू शकतो. याच सामाजिक बांधिलकीतून देवस्थानच्या वतीने मानवसेवेचा हा सुंदर संकल्प करण्यात येत आहे.
हे शिबीर सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत पार पडणार आहे. तरी पाली परिसरातील नागरिक, भाविक आणि तरुणांनी या पवित्र सेवाकार्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे नम्र आवाहन देवस्थान आणि रुधिरसेतू सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
