• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

ByEditor

Sep 10, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग:
येथील श्री महावीर चौक येथील ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिला आरोपी वनिता प्रदीप वाघमारे (कात्रज, पुणे) हिस पियुष मेहता यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी माहिती की, अलिबाग शहरातील श्री महावीर चौक येथे असणाऱ्या श्री ज्वेलर्स येथे रविवार, दि. 3 सप्टेंबर रोजी 12:25 वा.च्या सुमारास महिला आरोपी वनिता प्रदीप वाघमारे (कात्रज, पुणे) हिने चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी रमेश बखतावमलजी मेहता यांचे श्री ज्वेलर्स ह्या दुकानामध्ये येवुन दुकानात काम करणाऱ्या माणसांचे लक्ष नाही हे पाहुन हातचलाखी करुन दुकानात ट्रेमध्ये असलेली 95,000/- रुपये किमंतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन महिला आरोपीत हिने चोरी केली. सदर महिला ही दिनांक 10 सप्टेंबर2023 रोजी परत पुणे स्वारगेट येथून बसने अलिबाग येथे आली होती. सदर महिला ही चोरी करण्याच्या उद्देशाने प्रथम सन गोल्ड ज्वेलर्समध्ये गेली होती आणि तद्नंतर ती रॉयल ज्वेलस येथे गेली असल्याची माहिती श्री ज्वेलर्सचे मालक रमेश मेहता यांचा मुलगा पियुष मेहता याला समजताच तो रॉयल ज्वेलर्सच्या बाहेर जाऊन थांबला आणि सदर महिलेची शहानिशा केली असता खात्री झाल्यानंतर अलिबाग पोलिसांना माहिती देताच पोलीस काही मिनिटातच येऊन सदर महिलेस ताब्यात घेतले. सदर महिलेस पोलिसी खाक्या दाखविताच तिने चोरी केल्याचे कबुल केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!