वैशाली कडू
उरण : सामाजिक बांधिलकी जपत समाजाची सेवा करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत त्यामध्ये उरण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील कार्याने सर्वांना परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या ५०व्या म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर अनेकांनी आरोग्याची तपासणी केली.

सदर शिबिराचे आयोजन रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी द्रोणागिरी लायन्स क्लब, अपोलो हॉस्पिटल बेलापूर, तेरणा हॉस्पिटल नेरुळ, सुषुशा हॉस्पिटल पनवेल व उरण मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने रक्त तपासणी, डोळे तपासणी, ईसीजी व हाडांची चाचणी अशा विविध आरोग्यविषयक तपासण्या व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नवी मुंबई हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल कामोठे व सद्गुरु ब्लड सेंटर कोपरखैरणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संतोष पवार यांनी ७०वे रक्तदान केले. विशेष म्हणजे कोविड सुरु झाल्यापासून ही १२वी वेळ आहे.
जेएनपीटी माजी ट्रस्टी भूषण पाटील यांनी रक्तदान करून रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष दिनेश घरत, उपाध्यक्ष काशिनाथ गायकवाड, सुवर्ण महोत्सवी समितीचे अध्यक्ष अरविंद घरत, सचिव सचिन वर्तक, डॉ. सुरेश पाटील, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घनश्याम पाटील, डॉ. दहिफळे, महेश म्हात्रे, नगरसेवक अतूल ठाकूर, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, सीमाताई घरत, काका पाटील, संदीप पाटील, विवेक देशमुख यांची कार्यक्रमांना प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांची सुद्धा या दोन्ही शिबिरांना उपस्थिती होती. दोन्ही शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान व आपल्या आरोग्यविषयक तपासण्या करून घेतल्या. यावेळी ७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर आरोग्य शिबिरात १८५ पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.