• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्ह्यात तब्बल ५३५ पदे रिक्त; पोलिस यंत्रणेला करावी लागते तारेवरची कसरत!

ByEditor

Oct 14, 2023

अमुलकूमार जैन
अलिबाग :
राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यात अट्टल गुंडांसह विविध प्रकारच्या माफिया टोळ्यांचे वर्चस्व आणि दहशत वाढत आहे. समाजकंटकांवर वर्दीचा धाक राहिला पाहिजे, ही भावना स्वाभाविक असली तरी अपुरे मनुष्यबळ,अत्याधुनिक साधनसुविधांचा अभाव असेल तर… सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यात ५३५ इतके अधिकारी कर्मचारी यांची पदे एकूण मंजूर पदांपेक्षा अधिकारी, पोलिसांची पदे रिक्त असल्याने आणीबाणीच्या काळात यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रायगड जिल्ह्यातील शहरासहित ग्रामीण क्षेत्रात २०२१ ते आजपर्यंतच्या कालावधीत गंभीर गुन्ह्यांचा टक्का वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांना जरब बसविण्यासाठी यंत्रणेवर अनेक मर्यादा येत आहेत. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख या तुलनेत पोलिस दलाची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येते. त्यासाठी मनुष्यबळासह यंत्रणा अद्ययावत करणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध पोलीस यंत्रणेला अक्षरशः कसरतच करावी लागत आहे. रायगड जिल्ह्यात सहा. पोलिस निरीक्षक/पोलिस उप निरीक्षक यांची मंजूर पदे २३६ असून मंजूर पदांपैकी पोलीस अधिकार्‍यांची तब्बल २७ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील २५ पोलीस ठाण्यांमध्ये दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मात्र, अधिकार्‍यांच्या कमतरतेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र विभागासाठी पोलीस अधिक्षक ते पोलीस हवालदार यांची ६७७ एकूण पदे मंजूर आहेत. मात्र, यामधील १३५ पदे रिक्त आहेत. पोलिस नाईक यांची पदे मंजूर पदे ही शून्य असताना देखील २०८ पदे भरली गेली आहेत. पोलिस शिपाई यांची १३२९ पदे मंजूर असताना देखील ३३४ पदे रिक्त आहेत. सहाय्यक फौजदार चालक पदे ही ६ मंजूर असून सहाही पदे रिक्त आहेत. पोलिस हवालदार चालक ही पदे २० पदे मंजूर असून १७ पदे रिक्त आहेत तर पोलिस शिपाई चालक ही पदे ४९ मंजूर असुन १६ पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून राज्य सराकरकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

अधिकारी, कर्मचारी पदे कमी असतानादेखील ९० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यास यशस्वी झाले आहेत. एकीकडे अधिकार्‍यांच्या कमतरतेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत असतानाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दलाने बाजी मारली आहे.

५३५ कर्मचार्‍यांची पदे रिक्त

रायगड जिल्हा पोलीस दलात ४३ पोलीस अधिकार्‍यांव्यतिरिक्त ५३५ पोलीस कर्मचार्‍यांची पदेही रिक्त आहेत. २ हजार ३१७ पोलीस कर्मचार्‍यांची पदे मंजूर असून, त्यामध्ये २ हजार ९० पदे भरण्यात आली आहेत. रिक्त पोलीस कर्मचार्‍यांमध्ये सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल यासह इतर पदांचा समावेश आहे.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिस दलाची कसरत

रायगड जिल्ह्यात राजकीय, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारीही फोफावली आहे. खासगी सावकारीसह संघटित गुन्हेगारी, टोळ्यांचे कारनामे वाढले आहेत. एकूण लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता पोलिस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्यावर मर्यादा येत आहेत.

पोलीस दल रिक्त अधिकारी

पदमंजूर पदेभरलेली पदे रिक्त पदे
पोलीस अधिक्षक1 1 0
अप्पर पोलीस अधिक्षक1 1 0
पोलीस उपविभागीय अधिकारी9 9 0
पोलीस निरिक्षक/सहाय्यक पोलीस
निरिक्षक/पोलीस उपनिरिक्षक
236 209 27
पोलिस हवालदार 677 542 135
पोलीस नाईक 0 208 0
सहाय्यक फौजदार चालक 6 0 6
पोलिस हवालदार चालक 20 03 17
पोलिस शिपाई चालक 49 33 16









By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!