• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शेतजूई येथून विवाहित महिला बेपत्ता

ByEditor

Nov 23, 2023

किरण लाड
नागोठणे :
कामावर जाते असे सांगून विवाहित महिला शेतजूई-बेणसे, ता. पेण येथून बेपत्ता झाली आहे. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार तीचे पती मंगेश पाटील यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली आहे.

नागोठणे पोलीस स्टेशन हद्दीतील शेतजूई-बेणसे, ता. पेण येथील विवाहित महिला मोनाली मंगेश पाटील (वय 26) या मंगळवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 12.30 वाजता शिहू, एमआयडीसी येथील गॅस एजन्सी येथे कामावर गेल्या असता तेथून कोणालाही काही न सांगता निघून गेल्या आहेत. तशी तक्रार तीचे पती मंगेश अनंत पाटील यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दि. 22 नोव्हेंबर रोजी दिली आहे. वरील घटनेचा अधिक तपास नागोठणे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सानप हे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!