• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

काँग्रेसचे खासदार धीरज साहू विरोधात भाजपा महिला मोर्चा आक्रमक

ByEditor

Dec 11, 2023

रोह्यात पुतळ्याला जोडे मारून व काळे फासून केला जाहीर निषेध

शशिकांत मोरे
धाटाव :
काँग्रेसचे संसद सदस्य खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने जवळपास ४०० ते ५०० कोटीहून अधिकची रोकड जप्त केली आहे या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून धीरज साहू यांच्या विरोधात भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाचे अध्यक्षा चित्राताई वाघ व दक्षिण रायगड भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांच्या आदेशानुसार रोह्यात आज सोमवार दि.( ११ ) रोजी रोहा नगरपालिकेच्या समोर दक्षिण रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमाताई मानकर यांच्या नेतृत्वाखाली साहू यांच्या पुतळ्याला जोडे मारून व काळे फासून जाहीर निषेध व्यक्त करुन साहू विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. तर दक्षिण रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण , महाड , श्रीवर्धन या चारही विधानसभा क्षेत्रात हेमाताई मानकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, धीरज साहू यांच्याकडे चारशे ते पाचशे रुपयांची रोकड सापडली ती एवढी रक्कम कुठून आली असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने काँग्रेसने जी गेली ५० ते ६० वर्ष सत्ता सत्तेमध्ये राहून अनेक घोटाळे केले सामान्य जनतेला लुबाडून विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःची घरे पैशाने भरली. जर एका खासदाराकडे एवढी रोकड सापडते तर अजुन किती भ्रष्ट खासदारांकडे रोकड आहे याचा हिशोब काँग्रेसचे राहुल गांधी यांनी द्यावा आणि त्यामुळे अशा भ्रष्ट काँग्रेसचा मी धिक्कार करते अशा दक्षिण रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमाताई मानकर या म्हणाल्या.

अमित घाग रोहा तालुका भाजपा अध्यक्ष, जयश्री भांड महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस , अपर्णा सुटे, धनश्री बापट, संगीता फाटक, रिया कासार ,मेघना भांड, मालती प्रजापती , पुर्वा म्हात्रे, अर्चणा वाघमारे, शारदेश इंगावले, बापु गरुड, कुंदन तांबडे यासह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!