• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सेनापती येसाजी कंक यांची जन्मभूमी दुर्गम कुर्डुपेठ गावात महापूजा उत्सवाचे आयोजन

ByEditor

Jan 17, 2024

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील निजामपूर जिते विभागामधील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कुर्डुगड व सेनापती येसाजी कंक यांची जन्मभूमी असलेल्या गावात गेल्या कित्येक वर्षापासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वार्षिक कार्यक्रमानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा व उत्सवाचे आयोजन शनिवार दि. २० जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.

या निमित्ताने हभप राम महाराज पासलकर यांचे कीर्तन व वारकरी सांप्रदायक संगीत भजन, धामण ओहोळ व भजनी मंडळ जिते यांचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने संपुर्ण मुंबईकर, ग्रामस्थ व महिला मंडळ, तरुण या उत्सवात सहभागी होणार आहेत. गावदेवी कुर्डाईदेवी व वरदाणीदेवी उत्सव, श्री सत्यनारायणाची महापूजा असल्याने सर्वांनी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिते गुपग्रामपंचायत सरपंच विमलताई भाऊ होगाडे, अध्यक्ष भाऊ होगाडे, उपाध्यक्ष बबनराव जोरकर, खजिनदार शिवाजी जोरकर, सचिव रविंद्र कोकरे, संदीप कोकरे, निलेश सांगळे, चिमन सांबरे, बाबु बगडे व ग्रामस्थ यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!