प्रतिनिधी
दिघी : म्हसळा तालुक्यातील खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शुक्रवारी हत्तीरोग सर्वेक्षण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशेहून आधीक हत्ती रुग्ण जुने आढळून आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा हत्तीरोग विभागाकडून ही तपासणी घेण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव हद्दीतील उपकेंद्र आंबेत वावे गावातील आंबेत, संदेरी विचारेवाडी गडदाव, फळसप, आमशेत, खारगाव तसेच तोराडी आदिवासी वाडी आणि पांगळोली या गावांमध्ये हत्तीरोग सर्वेक्षण करण्यात आले. ठाणे हत्तीरोग विभागाचे आरोग्य सहाय्यक फरडे, कीटक समहारक व क्षेत्र कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र खामगावचे अतिरिक्त आरोग्य सहाय्यक तथा आरोग्य सेवक मंगेश चव्हाण यांच्या समन्वयाने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण झाले.
या गावांमध्ये सायंकाळी सात नंतर रक्त नमुने संकलीत करण्यात आले. या कामासाठी सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. या सर्वेक्षण साथी आरोग्य सेवक मंगेश चव्हाण यांची महत्वाची भूमिका आहे. ते 2019 पासून आंबेत येथे कार्यरत आहेत. कोरोनामध्ये उल्लेखनीय कौतुकास्पद कामगिरी तसेच वेळोवेळी येत असलेल्या योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. नव्याने सुरू झालेल्या आंबेत दवाखान्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन पूर्ण ताकदीनिशी दवाखाना कर्मचारी संघ कमी असताना देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे.