संपूर्ण शहरांतील वातावरण झाले धार्मिक आणि आनंदमय
वैभव कळस
म्हसळा : पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत २०८० सोमवार, दिनांक २२ जानेवारी २०२४ या शुभदिनी प्रभु श्रीरामांच्या मूर्ती अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात येणार आहे. यावेळी आयोध्येसह हिंदूस्तानातील सर्व प्रांतातील गावागावांत धार्मिक आणि आनंदमय वातावरण व्हावे यासाठी आयोध्येतून केलेल्या आवाहनानुसार तालुक्यांत हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील आणि शहर अध्यक्ष नंदू गोविलकर, सुनिल उमरोठकर आणि अन्य कार्यकर्ते यांच्या माध्यमांतून मंदिर परिसर स्वच्छता, मूर्तींची आकर्षक रंगरंगोटीचे काम जोमाने सुरु आहे.
यासाठी गिरगाव-ठाकूरद्वार येथील राजन वेदक यांचे सहकार्य आणि तांत्रिक मदतीने शहरवासियांनी श्री गणेश, श्रीराम मंदिर आणि श्री राधाकृष्ण मंदिरातील मूर्तींचे रंगकाम केले. पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या आवाहनानुसार विविध समाज शहरांतील सर्व मंदिर परिसरात स्वच्छता करणार आसल्याचे सुनिल उमरोठकर यांनी सांगितले.