• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

परवानगी शंभर आणि उत्खनन हजार ब्रास

ByEditor

Feb 9, 2024

श्रीवर्धनमध्ये महसूल अधिकारी भूमाफियांच्या दावणीला?

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात भूमाफियांनी धुडघूस घातला असून अवैध माती उत्खननाचा सपाटा चालविला आहे. हजारो ब्रासचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊन तसेच तक्रारी होऊनही महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. महसूल विभागाचा अभय मिळत असल्याने माती उत्खनननाला आळा बसण्याऐवजी गती प्राप्त झाल्याचे चित्र श्रीवर्धन तालुक्यात दिसून येत आहे.

जमिनीला सोन्याचा भाव आल्याने जो तो आता जमीन सुशोभित करून विकण्याच्या मार्गावर असून, डोंगर फोडून माती काढण्याचे काम सुरू आहे. यावर धनदांडगे व्यवसाय सुरू करण्यासाठी हालचाल करत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले, दिवेआगर, बोर्लीपंचतन, दिघी, कुडगाव तसेच बागमांडला, मारळ भागात अनेक गावांत माती चोरीचे प्रस्थ वाढल्याचे पाहावयास मिळत आहे.

डोंगर सपाटीकरण करण्याच्या नावाखाली माती व मुरूमाची बेकायदेशीररित्या दिवसाढवळ्या तस्करी सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलॅन मशीन्सच्या सहाय्याने सर्व नियम पायदळी तुडवत जमीन खोदून मुरूम लंपास केला जात आहे. परंतू डोंगर फोडून माती काढणाऱ्यावर कारवाई होताना दिसत नाही. नियम धाब्यावर बसवून माती उत्खनन होत असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, हा सर्व प्रकार सराईतपणे होत असून कुणाला कायद्याची किंवा कारवाईची भीती राहिलेली नाही.

रॉयल्टी फक्त नावालाच
श्रीवर्धन तालुक्यातील अवैध माती उपशाच्या पाठीमागे दडलेले गौडबंगाल सर्वसामान्य नागरिकांना उलगडेनासे झाले असून कमी ब्रासची राॅयल्टी काढून जास्त ब्रास माती काढणे किंवा शेकडो ब्रास राॅयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याचे अनुचित प्रकार तालुक्यात घडत असल्याने शासनाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे.

साहेबांचं नेहमीप्रमाणे बघतो, करतो…
याबाबत महसूल विभागात माहिती घेण्यात आली. रॉयल्टी पेक्षा जास्त करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर माती भरावाचे मोजमाप करून कारवाई करण्यात यावी. मात्र, अधिकारी नेहमी प्रमाणे म्हणतात बघतो, करतो.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!