• Wed. Jul 16th, 2025 12:35:24 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आजचे राशिभविष्य

ByEditor

Apr 22, 2024

सोमवार, २२ एप्रिल २०२४

मेष राशी
गर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल
भाग्यांक: 4

वृषभ राशी
तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळित असणार नाही. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होईल. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.
भाग्यांक: 3

मिथुन राशी
तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल – आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. जर तुम्हाला वाटते की, काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्या सोबत राहून तुमची वेळ खराब होते तर, त्यांचा साथ तुम्ही सोडला पाहिजे. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.
भाग्यांक: 1

कर्क राशी
तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.
भाग्यांक: 5

सिंह राशी
आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्यीच शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल..
भाग्यांक: 3

कन्या राशी
प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमच्या जोडीदारासमवेत रोमान्स करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे. 
भाग्यांक: 2

तूळ राशी
प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. आज कुणी विपरीत लिंगीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. आपली ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक.
भाग्यांक: 4

वृश्चिक राशी
उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे परंतु कामुक भावना उद्दिपित झाल्याने जोडिदाराशी संबंध बिघडतील. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल.
भाग्यांक: 8

धनु राशी
नातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि आत्यंतिक गरज असणारा रिलिफ मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय मते लादू नका, कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत, आणि ते विनाकारण नाराज होतील. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे! तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही? आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल.
भाग्यांक: 3

मकर राशी
तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमी विषयी कुठले ही मत मांडू नका. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.
भाग्यांक: 2

कुंभ राशी
खासकरून हृदयविकाराच्या रुग्णांनी कॉफी प्राशन करणे सोडावे. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. रोमान्सची संधी स्पष्ट दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे असेल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या जवळ वेळ असेल परंतु, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतृष्ट करेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे.
भाग्यांक: 9

मीन राशी
संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.
भाग्यांक: 7

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!