• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुनील थळे यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात केला साजरा

ByEditor

May 17, 2024

सुनील थळे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव, मान्यवरांची उपस्थिती

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील बहिरोळे-टाकादेवी येथील रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य तसेच मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील थळे यांनी आपला वाढदिवस १५ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला.

सुनील थळे यांची ख्याती म्हणजे उत्तम समाजसेवक म्हणून ते जनमानसात प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे मदतीसाठी व कामानिमित्त आलेला सर्वच समाजातील प्रत्येक गरजू कधीही रित्या हाताने व निराश होऊन जात नाही, किंबहुना याची पुरेपूर काळजी ते नेहमीच घेत असतात. आपल्या सामाजिक कार्याच्या व विकासाच्या जोरावर त्यांनी गेली ३० वर्षे मापगाव ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. बुधवार, दि. १५ मे २०२४ रोजी सुनिल थळे यांना ६०व्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शासकीय अधिकारी व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.

सुनील थळे यांनी दुपारी चार वाजता आपली सामाजिक बांधिलकी जपत परहुर येथील श्री समर्थ वृद्धाश्रम येथे वृद्धांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करत वृद्धांचे आशीर्वाद घेतले. तसेच वृद्धांची मनोभावे काळजी घेणारे वृद्धाश्रमाचे संचालक ॲड. जयेंद्र गुंजाळ व त्यांचे सहकारी यांचे कौतुक करत आर्थिक मदत केली. यावेळी सुनील थळे यांची आई सुमित्रा थळे, सासुबाई श्रीमती सुलोचना दळवी, पत्नी सुनिता थळे, युवा नेते सुचित थळे, कु. श्रेयस उमेश थळे, कु. सार्थक उमेश थळे, गुरुवर्य चांदोरकर सर, उद्योजक अशोक कुंभार – राजगुरुनगर, सुरेश कोते – आळेफाटा, संजय शिंदे, सचिन घाडी, विवेक जोशी, केसरीनाथ माने, विलास चापडे व इतर नातेवाईक, कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनील थळे यांनी संध्याकाळी ७ वाजता बहिरोळे-टाकादेवी येथील आपल्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक, राजकीय व सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, त्यांचे चाहते, कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपस्थित सर्वांनी रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देत भोजनाचा आस्वाद घेतला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!