• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाडचा निकाल १०० टक्के

ByEditor

May 28, 2024

कस्तुरी लोखंडे ९४.८०% गुण संपदान करून प्रथम

विश्वास निकम
कोलाड :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल सोमवार, दि. २७ मे २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या परीक्षेत द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असुन कस्तुरी तुषार लोखंडे हिने ९४.८०% गुण संपदान करून शाळेत सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला.

ओम अशोक सानप याने ९१.८०% गुण मिळवून द्वितीय, वैष्णवी विठोबा कदम हिने ९१.००% गुण मिळवून तृतीय, वेदांत विठोबा बारस्कर याने ९०.६०% गुण मिळवून चतुर्थ, तर अदिती चंद्रकांत धामणसे हिने ९०.४० % गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्यध्यापक तिरमले सर, देशमुख सर, तांडेल सर, डी. आर. पाटील, घोणे सर, साखरले सर, अविनाश माळी सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!