• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वनवासी कल्याण आश्रमतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

ByEditor

Jul 9, 2023

वैशाली कडू
उरण :
वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र उरणच्या वतीने रविवार ९ जुलै 2023 रोजी उरण तालुक्यातील कोप्रोली वाडीवरील विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके, शालोपयोगी साहित्य पौष्टीक खाऊ, छत्री वाटप करण्यात आले.

वनवासी कल्याण आश्रमचे कुणाल सिसोदिया सहसचिव वनवासी कल्याण आश्रम, सदस्य ऍड. आकाश शाह, खजिनदार दीपक गोरे, अंशकालीन कार्यकर्त्या व ग्रामपंचयात सदस्या बेबीताई, आमचे सहकारी मित्र कुणाल पाटील आणि संजय दाते (सेवानिवृत्त उ. न. प. कर्मचारी) आदी उपस्थित होते. बेबीताई कातकरी यांनी सगळ्यांचे स्वागत केले.

मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजावून त्यांना शिकायची प्रेरणा वनवासी कल्याण आश्रमाच्या सहसचिव कुणाल शिसोदिया यांनी दिली. आकाश शहा यांनी वनवासी स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती मुलांना दिली. त्यांच्यात आत्मविश्वासाची प्रेरणा जागृत केली. मुलांनी जयहिंदचे नारे देत एक वेगळाच माहोल तयार केले होते.

वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र, उरणचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जितेंद्र परमार यांचे विशेष सहकार्यने हा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व मुलांना मेघा समीर पाटील यांच्या वतीने पौष्टीक खाऊ देण्यात आला. वाडीवरील 35 मुलांना या कार्यक्रमाचा लाभ घेतला. दिपक गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!