शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; माजी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांचा शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी १७ वर्षांनंतर आपल्या समर्थक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींसह पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य संपादक
शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ | दुपारी ५:३७ ● २९८ वाचन (Views)
श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; माजी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांचा शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय
जाहिरात (Advertisement)
श्रीवर्धन (संदेश घोलप) रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १७ वर्षांनंतर ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतणार आहेत. राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

​खासदार सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांचा प्रभाव असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात विचारे यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

जाहिरात (Advertisement)
​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात केवळ दर्शन विचारेच नव्हे, तर त्यांच्यासोबत अनेक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

​माजी तालुका अध्यक्ष म्हणून काम केल्यामुळे विचारे यांचा मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागात दांडगा जनसंपर्क आहे. १७ वर्षांपूर्वी ज्या पक्षात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, त्याच पक्षात ते पुन्हा दाखल होत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते श्रीवर्धनमध्ये उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडीमुळे श्रीवर्धनच्या राजकारणात शिवसेनेची ताकद वाढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेससमोर आपला गड राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

ऑनलाइन विवाहाच्या आमिषाने उरणमधील तरुणीला ५.५२ लाखांचा गंडा

उरणमधील ३० वर्षीय तरुणीला मॅट्रिमोनी साईटवर स्थळ शोधणे महागात पडले असून, परदेशी नवरदेवाच्या आमिषाने सायबर भामट्यांनी तिला ५.५२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

ऑनलाइन विवाहाच्या आमिषाने उरणमधील तरुणीला ५.५२ लाखांचा गंडा

उरणमधील ३० वर्षीय तरुणीला मॅट्रिमोनी साईटवर स्थळ शोधणे महागात पडले असून, परदेशी नवरदेवाच्या आमिषाने सायबर भामट्यांनी तिला ५.५२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

महाड तालुक्यात खळबळ: ग्रामसेवक गजानन गाढवे यांचा संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह

महाड तालुक्यातील दहिवड आणि वाळण परिसरातील जंगलात पंदेरी गावचे ग्रामसेवक गजानन गाढवे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्राथमिक संशय असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

"आम्ही मान इकडे तिकडे केली असती तर त्यांची सीट गेली असती"; मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना सुनावलं

रायगडमधील चौघा आमदारांमुळेच खासदार सुनील तटकरे निवडून आले असल्याचा दावा करत, मंत्री भरत गोगावले यांनी उदय सामंत यांच्या विधानाची जोरदार पाठराखण केली.